गुढीपाडव्यानिमित्त कुसुंबीत
पंचाग पूजन, वाचनाची
रूढी परंपरा कायम
मेढा : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्ताने हिंदू नववर्षाचे आगमन होते असते. याचेच औचित्य साधत अनेक गावांमध्ये पंचांग वाचनाची परंपरा रूढ आहे. कुसुंबीतील काळेश्वरी मंदिरात पाडव्यानिमित्ताने पंचागाचे पूजन व वाचन करण्यात आले.
हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण घरोघरी गुढी उभारून साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्यालाच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गुढीपाडव्यानिमित्ताने हिंदू पंचांगाचे पूजन व पंचागाचे वाचन करण्याची परंपरा पूर्वीपासून अनेक गावांत सुरू आहे.
कुसुंबी (ता. जावली) गावातही गुढीपाडव्यानिमित्ताने पंचागाचे पूजन व वाचन करण्यात आले. यावेळी कुसुंबीतील काळेश्वरी मंदिरात सरपंच मारुती चिकणे यांच्या हस्ते पंचागाचे पूजन पुजारी गणेश गुरव यांच्याकडून करण्यात आले. यावेळी पंचागाचे वाचन करण्यात आले. यादरम्यान वर्षभरातील पर्जन्य, शेती, राजकीय घडामोडी इत्यादी विषयांचा अंदाज पंचांग वाचून सांगण्यात आला. तसेच कडूलिंब व गूळ यांचा प्रसाद उपस्थितांना देण्यात आला.
यावेळी पंचाग पूजन व वाचन कार्यक्रमासाठी सरपंच मारुती चिकणे, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे रामदास वेंदे, संतोष चिकणे, विजय वेंदे, पोलीस पाटील एकनाथ सुतार, जगन्नाथ चिकणे, आनंदराव चिकणे, जितीन वेंदे, अजय कुंभार, बाजीराव चिकणे भीमराव चिकणे, जगन्नाथ चिकणे, जगन्नाथ चिकणे, जनार्दन गुरव, नामदेव वेंदे, अशोक चिकणे, रामकृष्ण वेंदे, दत्तात्रय सुतार, यशवंत चिकणे, जिजाबा वेंदे, अशोक साळुंखे, गोविंद चिकणे, ज्ञानेश्वर चिकणे, बाबू जाधव, सर्जेराव चिकणे, योगेश चिकणे, युवराज कदम, तेजस वेंदे, पत्रकार विश्वनाथ डिगे व जितीन वेंदे यांच्यासह कुसुंबी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!