रामराजे नाईक-निंबाळकर यांचा
अभिष्टचिंतन सोहळा उत्साह
फलटण : तालुक्याचे भाग्यविधाते, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस गुढीपाडव्याच्या दिवशी फलटण येथील लक्ष्मीविलास या त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा झाला. यावेळी फलटण तालुक्यातील गावागावांतून आलेल्या त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती.
सकाळी नऊ वाजता रामराजे यांनी शुभेच्छा स्वीकारायला सुरुवात केली. तत्पूर्वी औक्षण करण्यात आले. त्यांच्यासोबत रामराजे यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते. रामराजे यांच्यावर प्रेम करणारे, गेली तीस- पस्तीस वर्षे निष्ठेने त्यांना साथ देणारे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रांगेत येऊन शिस्तीने त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावर्षी रामराजे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहाने विविध स्पर्धा, लोकोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शहरासह गावोगावी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, फळे वाटप, चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी, गायन स्पर्धा, त्याचबरोबर समाजोपयोगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जम्बो हार आणला होता. तब्बल तीस फूट उंचीचा हा हार लक्ष्मी विलास निवासस्थानी पोहोचविण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. यावेळी पारंपरिक वाद्य वाजवली जात होती.
रामराजे नाईक-निंबाळकर यांना राजकीय, सामाजिक अन् शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांनी मोबाइलद्वारे शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजीवराजे नाईक- निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक- निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीराम जवाहर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य सोसायटीचे चेअरमन व सदस्य उपस्थित होते. दिवसभर विविध ठिकाणी रामराजे यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!