विठुराया, जनतेला सुखी व समृद्ध
ठेव : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
प्रतिपंढरपूर करहर येथे विठ्ठलचरणी प्रार्थना, महापूजा भक्तीमय वातावरणात संपन्न
सातारा : आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहर (ता.जावली) येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. जनतेला सुखी आणि समृद्ध ठेव, अशी प्रार्थना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी विठ्ठलचरणी केली.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी! या उत्सवानिमित्त दरवर्षी प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या करहर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करहरनगरीत विठुरायाची महापूजा भक्तीभावाने संपन्न झाली. करहर येथील विठ्ठल मंदिरात सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ही महापूजा पार पडली. यावेळी करहर येथील तीन वारकरी दाम्पत्यांनाही विठुरायाच्या पुजेचा मान देण्यात आला.
यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत आ. शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, तहसीलदार हणमंत कोळेकर, करहरच्या सरपंच सौ. सोनाली यादव, प्रसाद यादव, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विठुरायाच्या पूजेनंतर मंदिरात भाविक- भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य लाभो अशी प्रार्थना विठ्ठल- रुक्मिणी चरणी केली. तसेच तमाम विठ्ठलभक्त आणि वारकरी बंधू- भगिनींना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
उन्नत्ती व उत्कर्ष परिवाराचे कुटुंबप्रमुख हनुमंत रांजणे यांच्या आर्थिक सहाय्यातून उभारले प्रतिपंढरपूरमध्ये पात्र शेड
प्रतिपंढरपूर करहर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पत्राशेडचे काम उन्नत्ती व उत्कर्ष परिवाराचे कुटुंबप्रमुख, उद्योजक व वहागावचे सुपुत्र श्री. हनुमंत बळवंत रांजणे यांच्या आर्थिक सहाय्यातून करण्यात आले. या पत्राशेडचे आज आषाढी एकादशीदिवशी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जलसंपदामंत्री शंशिकांतजी शिंदे, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या या पत्राशेडचे उद्घाटन हस्ते संपन्न झाले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!