रवींद्र ढोणे भैय्या मित्र समूहातर्फे ना. शिवेंद्रराजेंचा वाढदिवस केक कापून साजरा

 


रवींद्र ढोणे भैय्या मित्र समूहातर्फे

ना. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस

केक कापून साजरा


सातारा : नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ढोणे कॉलनी येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.


नगरसेवक रवींद्र ढोणे (भैय्या) यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी महिलांना संसारोपयोगी साहित्य वाटप समारंभ झाला. 


यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ कुपनचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना शिवेंद्रराजांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.


सर्व नागरिक व माता- भगिनींच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आभार मानले.

Post a Comment

0 Comments