आई-वडील, शिक्षकांचा
कायम आदर ठेवा :
मुख्याध्यापक पी. जे. कांबळे
दापवडी येथे दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
सातारा : "माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. यामध्ये सहभागी झाला, त्याचा मला आनंद झाला. असेच प्रेम कायम घट्ट राहू द्या. तुमचा सहवास मला असाच कायम मिळत राहो. भविष्यातही असेच एकत्र येऊन एकमेकांचे विचार, सुख-दुःख शेअर करा. आई-वडील, शिक्षकांचा कायम आदर ठेवा," असे प्रतिपादन दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे सर यांनी केले.
जावळी तालुक्यातील दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी ३० वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी १९९५-९६ बॅचचे सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी मुख्याध्यापक तथा १९९५-९६ बॅचचे वर्गशिक्षक पी. जे. कांबळे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांचे वाढदिवस केक कापून साजरा केला.
यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बांधकाम व्यवसायिक, समाजसेवक मोहन बेलोशे, डीमार्टचे व्यवस्थापक विलास जगताप, माजी सैनिक सचिन भिलारे व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष शिराळे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
गेल्या ३० वर्षांनंतर भेटलेले हे माजी विद्यार्थी मित्र भेटीने सुखावून गेले. अनेक गोड-कटू आठवणींनी सांगता समारंभास रंगत आली. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पुन्हा आपला परिचय करून देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी महाबळेश्वर दर्शनचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर दर्शन जर्नीमध्ये भाग घेतला आणि हा स्नेहमेळावा अविस्मरणीय झाला. या मेळाव्याला गाणी, गप्पांच्या मैफलीत, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन स्नेहमेळाव्याची सांगता झाली. स्नेहमेळाव्यामुळे मित्र-मैत्रिणींची नाळ अधिक घट्ट झाली.
यावेळी माजी सर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून काही ठराव घेतले. या माध्यमातून या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींना भविष्यात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करता येईल यावर विचारविनिमय झाला. ही बॅच आर्थिकदृष्ट्या कशी सक्षम होईल, सामाजिक बांधिलकी कशी जगता येईल त्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ..! या उक्तीप्रमाणे सर्व माजी विद्यार्थ्यांनी काम करण्याचे वचन दिले. बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य व आर्थिक बाबींवर एकमताने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हे निर्णय आगामी वर्षांमध्ये सुरू करण्याचे अभिवचन सर्वांनी दिले.
मोहन बेलोशे यांनी प्रास्ताविक केले, तर संतोष शिराळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्ञानेश्वर रांजणे, चंदू गोळे, शरद गोळे, अनिल रांजणे, दत्तात्रेय गावडे, सचिन भिलारे, सचिन धनावडे, विलास जगताप, अरुण बेलोशे, अंकुश रांजणे, संतोष जंगम, महेंद्र रांजणे, अमोल गोळे, संदीप गोळे, रवींद्र गावडे, प्रतिभा रांजणे, अरुणा रांजणे, सुजाता रांजणे, मनीषा रांजणे, सीमा रांजणे, रेश्मा पवार, मंगल पार्टे, प्रतिभा रांजणे, नयना बेलोशे, संजीवनीता रांजणे, हेमा रांजणे, प्रमिला शिंदे, राजश्री रांजणे, लता कासुर्डे, मंगल गोळे, निरंजना रांजणे आदी सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यासाठी परिश्रम घेतले.
एक आठवण जिव्हाळ्याची; शाळा इमारतीच्या मुहूर्तमेढची...!
दापवडी हायस्कूलमध्ये पाच वर्षांपूर्वी याच बॅचने मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व गुरुजनांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात हायस्कूलला नवीन इमारत बांधून देण्यासाठी या बॅचने निश्चय करून निर्णय घेतला आणि त्याची मुहूर्तमेढ स्नेहमेळाव्यातच रोवली. याच वेळी रोख व साहित्य स्वरूपात लाखोची देणगी या स्नेहमेळाव्यात जमा करून ती हायस्कूलला देण्यात आली. आज ही इमारत डौलाने उभी असून यात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!