"डिजिटल मीडिया"च्या
तिसऱ्या महाअधिवेशनाचे
ना. गणेश नाईक यांना निमंत्रण
मुंबई : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे होत आहे. या महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. आज "डिजिटल मीडिया"चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक राजा माने यांनी विधानभवनात वनमंत्री ना. गणेश नाईक यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. यावेळी राजा माने यांच्या समवेत कोल्हापूरचे पत्रकार संतोष पाटील उपस्थित होते.
यावेळी राजा माने यांनी नामदार गणेश नाईक यांना डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या विस्तार व कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सुमारे अर्धा तास ही चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये महाबळेश्वर, कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनाचे माहिती देण्यात आली. शिवाय राज्यातील राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाली. यावेळी ना. नाईक यांनी अधिवेशनाला येणार असल्याचे सांगितले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!