चांदवडी येथे वॉटर
एटीएमचे लोकार्पण
सातारा : चांदवडी (ता. वाई) येथे वॉटर एटीएमचे लोकार्पण वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते झाले. दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व क्लाऊड वर्क्स सोल्युशन कंपनीमार्फत पाणी शुद्धीकरणाचे मशीन देण्यात आले. याला चार लाख २० हजार रुपये खर्च आला असून ग्रामपंचायतीने लोकसहभागातून २० टक्के रक्कम अदा केली.
वॉटर एटीएम मशीन लोकार्पण सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होते, तसेच कंपनीचे चेअरमन व संचालक उपस्थित होते. यावेळी त्यांच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने चांदवडी येथील प्राथमिक शाळेत वृक्ष लागवड करण्यात आली व शाळेची खेळणी रंगवण्यात आली. यावेळी गावाचे सरपंच फरीदा शेख, उपसरपंच रामदास शिंदे उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी श्री. परीट म्हणाले, चांदवडी ग्रामपंचायतीला वॉटर एटीएम मशीनच्या मागणीनुसार दीपस्तंभ चार्ट व क्लाईव्ह व सोल्युशन कंपनीमार्फत संपूर्ण मिशन देण्यात आली. यामुळे गावाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार असून हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहणार आहे. चांदवडी गावाने विविध उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात हे गाव जिल्ह्यात विकासाबाबतीत आपला वेगळा ठसा निर्माण करेल.
यावेळी हर घर सोलर योजनेबाबत श्री. जाधव उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच रामदास शिंदे उपक्रमाबाबत माहिती सांगितली. एटीएममधून पाच रुपयांमधून दहा लिटर पाणी व दहा रुपयातून वीस लिटर पाणी मिळेल.
सुनील शिंदे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, रेखा शिंदे, स्नेहल शिंदे, यमुना काकडे, पोलीस पाटील योगेश शिंदे, नरेश वाघ, अमोल शिंदे, ज्ञानदेव पोळ, बचत गटाचे अध्यक्ष महिला, जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!