मोटारसायकल चोरी प्रकरणी
सराईत चोरट्यास अटक
संशयित आरोपीकडून तीन मोटारसायकल हस्तगत
सातारा शहर डी.बी. पथकाची कामगिरी
सातारा : वाढे फाटा परिसरात एक सराईत चोरटा मोटारसायकलवरून जात असताना आढळून आला. त्यावेळी त्याचा पाठलाग करून डी. बी. पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडे एक विना नंबर प्लेट मोटारसायकल मिळून आली. याबाबत चौकशी केली असता ती चोरल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी दोन मोटारसायकल चोरी केल्याचे त्याने कबूल केले. त्याच्याकडून दोन मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र म्हस्के यांनी सातारा शहरातून चोरीस जाणारे मोटारसायकल चोरट्यांचा शोध घेण्याबाबत डी. बी. पथकास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सातारा डी.बी. पथकाने रेकॉर्डवरील मोटारसायकल चोरट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. मोटारसायकल चोरीतील एक सराईत चोरटा वाढे फाटा परिसरात मोटारसायकलवरून जात असताना दिसून आल्याने त्याचा पाठलाग करून डी. बी. पथकाने त्यास पकडले. त्याच्याजवळ एक विना नंबर प्लेट मोटारसायकल मिळून आली. या मोटारसायकलबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता ती चोरी केली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी दोन मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्या दोन मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी सातारा विभाग श्री. राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, श्री. सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, निलेश यादव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पो. कॉ. इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी केली आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!