ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी दिल्या खा. उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

 


ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी

दिल्या खा. उदयनराजे भोसले

यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माध्यमतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार राजा माने सर यांनी जलमंदिर येथे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजा माने सर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी औपचारिक चर्चा केली. त्यानंतर श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांची भेट घेऊन औपचारिक चर्चा केली.



या वाढदिवस शुभेच्छाप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, उपाध्यक्ष संदीप माने, संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे, सदस्य श्रीधर निकम, शहराध्यक्ष अजित सोनावणे, जावळी तालुकाध्यक्ष सुनीलअण्णा धनावडे, सचिव चंद्रशेखर जाधव,  राज्य साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष संजय आदी सदस्य उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments