जावळीत महसूल व वन विभागातर्फे 'सेवा सेतू' शिबिर; मेढा येथे सोमवारी महाराजस्व समाधान शिबिर’ व 'सेवा सेतू अभियान; नागरिक, शेतकऱ्यांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन

जावळीत महसूल 

व वन विभागातर्फे 

'सेवा सेतू' शिबिर

मेढा येथे सोमवारी महाराजस्व समाधान शिबिर’ व 'सेवा सेतू अभियान

नागरिक, शेतकऱ्यांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन

मेढा : प्रतिनिधी 

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जावळी तालुक्यातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या विविध प्रशासकीय कामांसाठी आणि योजनांच्या लाभासाठी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसिल कार्यालय जावळी (मेढा) येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' तसेच 'सेवा सेतू अभियान' अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० वाजता सुरू होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी केले आहे.

शासनाच्या ९ जुलै २०२६ व १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार हे शिबिर आयोजित केले जात आहे. या अभियानांतर्गत प्रलंबित वन हक्क दावे मंजूर करणे, वन हक्क दाव्यात सुधारणा करणे आणि ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका घेऊन योग्य ते अधिकार अभिलेख तयार करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

शिबिरात उपलब्ध होणाऱ्या मुख्य सेवा व योजना:

१. प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करणे व जिवंत सातबारा मोहीम

२. गावठाणातील नागरिकांना 'स्वामित्व सनद' वाटप करणे

३. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते उपलब्ध करणे

४. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे (रेशनकार्ड) वितरण

५. नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे

६. पात्र लाभार्थ्यांना वन हक्क दावे मंजूर करणे

७. मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे

८. नव्याने नळ जोडणी देणे

९. मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे

१०. प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे

११. मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदवणे

१२. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरींकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे

१३. दिव्यांग प्रमाणपत्र देणे

१४. विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे

१५. आधार कार्ड सेवा

१६. जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे

१७. शिकाऊ वाहन चालक परवाना (Learner License)

१८. महिला बचत गट नोंदणी

१९. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र

२०. महिला शेतकरी यांना प्रमाणपत्र वाटप करणे

२१. ७/१२ व ८ अ च्या नोंदी अद्ययावत करणे

२२. जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे.

तहसील कार्यालय जावळी (मेढा) येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा परिसरातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी केले आहे.  

Post a Comment

0 Comments