ॲड. विनित पाटील यांनी घेतला सैनिक कल्याण विभागाच्या योजनांचा आढावा; आजी-माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास

ॲड. विनित पाटील यांनी

घेतला सैनिक कल्याण

विभागाच्या योजनांचा आढावा

आजी-माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास 

सातारा | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या माजी सैनिक आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. विनित विलास पाटील यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान सैनिक कल्याण विभागामार्फत आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सुविधा आणि कल्याणकारी उपक्रमांची माहिती घेण्यात आली. तसेच जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न तसेच सैनिक कल्याणाशी संबंधित अन्य महत्त्वाच्या बाबींवरही चर्चा करण्यात आली.

लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार यांचा या भेटीदरम्यानचा संवाद अत्यंत दिलखुलास आणि सकारात्मक असल्याचे अॅड. विनित पाटील यांनी सांगितले. आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास या भेटीतून निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. सैनिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि माजी सैनिक आघाडी यांच्यात समन्वय वाढविण्याची गरज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Post a Comment

0 Comments