ओबीसी जनगणनेवर केंद्र सरकारविरोधात संताप; सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा तीव्र निषेध; जातीनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; अन्यथा देशभर आंदोलनाचा इशारा

ओबीसी जनगणनेवर

केंद्र सरकारविरोधात संताप

सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा तीव्र निषेध

जातीनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी

सातारा | प्रतिनिधी

केंद्र सरकारने 3 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात ओबीसींच्या स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा आरोप करत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना न केल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून ओबीसींच्या स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेच्या राजपत्रात केवळ लोकसंख्या गणनेचा उल्लेख असून ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची पुन्हा एकदा फसवणूक होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. जनगणनेच्या सर्व टप्प्यांत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम देऊन तातडीने जातीनिहाय जनगणना जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रासह देशभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या

ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावा.

अधिकृत जातीनिहाय ओबीसी जनगणना करावी.

जनगणनेच्या प्रत्येक टप्प्यात ओबीसींची नोंद स्पष्टपणे करावी.

मागणी मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments