गारवा हॉटेलच्या बिर्याणीत
झुरळ?; पर्यटकांचा संताप
कासहून परतणाऱ्या पर्यटकांचा आरोप
FDA कडून चौकशी व कारवाईची मागणी
सातारा | प्रतिनिधी
कास पठारावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या ग्रुपने कास मार्गावरील हॉटेल 'गारवा' येथे दिलेल्या बिर्याणीत झुरळ आढळल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे पर्यटकांनी संताप व्यक्त करत हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला.
पर्यटकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी बटर चिकन, चिकन हंडी आणि पाच बिर्याणीची ऑर्डर दिली होती. बिर्याणी खात असताना त्यामध्ये मोठे झुरळ आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. याबाबत विचारणा केल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला मालक उपस्थित नसल्याचे सांगितले. नंतर एका जबाबदार व्यक्तीने "चुकीने झाले असेल" असे सांगत दोन बिर्याणीचे बिल रद्द करून माफी मागितल्याचा दावा पर्यटकांनी केला.
या घटनेमुळे हॉटेलमधील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!