वाढे फाटा उड्डाणपुलाखाली 'विश्रांती' की बेघरांचा आसरा? सुशोभीकरणावर प्रश्नचिन्ह; सार्वजनिक जागेचा होत असलेला गैरवापर; प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

वाढे फाटा उड्डाणपुलाखाली

'विश्रांती' की बेघरांचा आसरा?

पालिकेने केलेल्या सुशोभीकरणावर प्रश्नचिन्ह

सार्वजनिक जागेचा होत असलेला गैरवापर

प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

संतोष शिराळे | सातारा 

सातारा शहरातील वाढे फाटा उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणासाठी कृत्रिम गवत, दगडी सजावट आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात ही जागा नागरिकांच्या वापराऐवजी काही बेघर व्यक्तींचा आसरा बनत असल्याचे चित्र समोर येत आहे.

वाडी फाटा येथील उड्डाणपुलाखालील सुशोभित जागेत एक व्यक्ती झोपलेली दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांच्या देखभालीबाबत आणि त्यांच्या योग्य वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या अशा जागांचा वापर जर निवाऱ्यासाठी होऊ लागला, तर सुशोभीकरणाचा उद्देशच फोल ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ही परिस्थिती केवळ सौंदर्यीकरणापुरती मर्यादित नसून बेघर आणि गरजू नागरिकांसाठी पुरेशा निवारा व्यवस्थेचा अभावही अधोरेखित करते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या ठिकाणी नियमित देखरेख ठेवून सार्वजनिक जागेचा योग्य वापर सुनिश्चित करावा, तसेच गरजू व्यक्तींना आवश्यक सामाजिक मदत व निवारा उपलब्ध करून देण्यासाठीही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments