फलटणमध्ये शिव आरोग्य सेनेचे
वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर
वारीतील हजारो भाविकांनी घेतला लाभ
माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त औषध वाटप
आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद
संतोष शिराळे | फलटण
संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूरकडे पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिव आरोग्य सेना, सातारा यांच्या वतीने फलटण येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिराचा मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी लाभ घेतला.
शिबिरात तज्ञ डॉक्टर, आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांनी वारकऱ्यांची तपासणी करून थंडी, ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, पायदुखी, जखमा, पोटदुखी, जुलाब आदी आजारांवर आवश्यक औषधांचे मोफत वितरण केले. दीर्घ पायी प्रवासामुळे उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमासाठी शिव आरोग्य सेनेचे जिल्हाप्रमुख निमिश शहा, आरोग्य सेना सचिव (माण-फलटण-खटाव) शैलेंद्र नलवडे, फलटण शहर समन्वयक अंकुश पवार, सातारा शहर समन्वयक मारुती वाघमारे, शिवसेना शहरप्रमुख प्रणव सावंत, ग्राहक संरक्षण कक्षाचे शैलेश बोडके, नंदकुमार काकडे, अभिजीत कदम, आनंद कदम, यशपाल यादव, प्रथमेश गायकवाड, अजय शिंदे, हणमंत बासर, ओंकार काळे, अनिकेत गुंजवटे, प्रणव कदम, ऋषिकेश कुंभार, युगांक मुळीक, युवा सेनेचे मोहित शहा, सोळशी देवस्थान सेवक धर्मेंद्र शहा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरास आळंदी देवस्थानचे प्रमुख ट्रस्टी आत्माराम शास्त्री महाराज, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. जे. टी. पोळ यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच फलटण तालुका मेडिकल असोसिएशन, निकोप हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल आणि क्रांतीसूर्य प्रतिष्ठान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!