ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात डराडो संस्थेचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांना दिवसभर चहा, बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप

ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात 

डराडो संस्थेचा सेवाभावी उपक्रम

वारकऱ्यांना दिवसभर चहा, बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे वाटप

फलटण | प्रतिनिधी

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त फलटण येथे डराडो (DARADO NGO) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट आणि पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत अखंड सुरू असलेल्या या सेवा उपक्रमाचा हजारो वारकऱ्यांनी लाभ घेतला.

पालखी सोहळ्यादरम्यान "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "ज्ञानेश्वर माऊली"च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात हा उपक्रम उत्साहात पार पडला. पायी वारीमुळे थकलेल्या वारकऱ्यांना चहा, बिस्कीट आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत स्वयंसेवकांनी सेवाभावाचे दर्शन घडविले.

"वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून संस्थेच्या स्वयंसेवकांनी दिवसभर निस्वार्थपणे सेवा बजावली. या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे डराडो संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

संस्थेचे विश्वस्त डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात व ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी देणगीदार, स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत, भविष्यातही समाजोपयोगी आणि लोकहिताचे असे सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

या उपक्रमात फुले, श्रीमती शिंदे, नाळे, शिंदे, सोनावणे बंधू, अडसूळ, सनी, पारसे, खरात, कणसे यांच्यासह संस्थेचे अनेक स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळे हा सेवायज्ञ यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment

0 Comments