सातारा तालुका पोलिसांची दमदार कामगिरी, चोरीच्या चार दुचाकी हस्तगत; आरोपी जेरबंद

सातारा तालुका पोलिस ठाणे

डीबी पथकाची दमदार कामगिरी

चोरीच्या चार दुचाकी हस्तगत; आरोपी जेरबंद

सातारा प्रतिनिधी - संतोष शिराळे : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत चोरीस गेलेल्या चार दुचाकी हस्तगत केल्या असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सातारा तालुका आणि सातारा शहर पोलीस ठाण्यांतील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २९ मार्च २०२६ रोजी फिर्यादी समीर असीफ मुलाणी (रा. परळी, ता. जि. सातारा) यांनी त्यांच्या घराच्या अंगणातून हिरो स्प्लेंडर (क्र. एमएच ११ बीएम ०१९७) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी आरोपीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार डी.बी. पथकाला चोरीची दुचाकी घेऊन एक संशयित इसम सातारा शहर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी कोडोली परिसरात सापळा रचून रेहान सिकंदर मुलाणी (वय २०, रा. अमरलक्ष्मी चौक, कोडोली, सातारा) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या. या कारवाईत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे दोन आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे दोन असे एकूण चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप कर्णे करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, सफौ उमेश माने, पोहवा संदीप कर्णे, दादा स्वामी, शिखरे, पंकज ढाणे, मनोज गायकवाड, संदीप पांडव, प्रल्हाद ढाकरे, संदीप आवळे, अभिजीत मोरे, उमेश बगाडे, पाचांगणे तसेच होमगार्ड विवेक शेडगे आणि सचिन सुतार यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments