अवैध दारू वाहतूक प्रकरणी ४ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त


अवैध दारू वाहतूक प्रकरणी ४

लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा शहर पोलिसांची दमदार कारवाई; अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ

सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत चारचाकी वाहनासह तब्बल ₹4,49,900 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते.

गोपनीय माहितीच्या आधारे शाहू चौक ते पोवई नाका मार्गावरील चैतन्य कॉम्प्युटर शॉर्ट इन्स्टिट्यूटसमोर पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी इको वाहन क्रमांक MH 11 DA 3160 संशयितरीत्या आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये व्हिस्की व बियरचे एकूण 27 बॉक्स आढळून आले.

पोलिसांनी वाहनासह एकूण ₹4,49,900 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 422/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (A)(E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये सपोनि अविनाश माने, पोउनि सुधीर मोरे तसेच पोलीस अंमलदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सुशांत कदम व सचिन रिटे यांनी सहभाग घेतला.

सदरच्या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments