पाच वर्षांपासून फरार असलेल्या डीपी चोरी प्रकरणातील आरोपीला अटक


पाच वर्षांपासून फरार असलेल्या

डीपी चोरी प्रकरणातील

आरोपीला अटक

वाठार पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ऊसाच्या शेतात पाठलाग करून जेरबंद

सातारा : वाठार पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाच वर्षांपासून फरार असलेल्या डीपी चोरी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनी ऊसाच्या शेतातून सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या.

दि. २० मे २०२६ रोजी फरार आरोपी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत आपल्या राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वाठार पोलीस स्टेशनचे डीबी पथक आणि लोणंद पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने संयुक्तरित्या कारवाई करत नियोजनबद्ध सापळा रचला.

पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ऊसाच्या शेतात सुमारे एक किलोमीटर पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लखन रमेश भोसले (रा. भुरकरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, पोउनि गहिनीनाथ सातव, नितीन भोसले, बुवा वाघमारे, पोलीस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, सहदेव तुपे, विवेक शिंदे, संदीप गोरे, आनंदराव भोसले, अमोल कर्णे, विठ्ठल काळे, प्रकाश मेळावणे, प्रतिक देशमुख, महिला पोलीस अंमलदार दिपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख तसेच लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप व त्यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर गिरी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments