दापवडी : सोनाली रांजणे व हनुमंत रांजणे यांचा सत्कार करताना किसन जाधव. शेजारी डी. के. जाधव व इतर.
दापवडी शाळेच्या
माजी विद्यार्थिनीने दिले
भव्य व्यासपीठ बांधून
सौ. सोनाली हनुमंत रांजणे व्यासपीठाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
पांचगणी : दापवडी (ता.जावली) येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयात उन्नती परिवार आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनीचे वतीने उभारलेल्या सौ. सोनाली हनुमंत रांजणे भव्य व्यासपीठाचे लोकार्पण विविध मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किसन जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उन्नती व उत्कर्ष परिवार संचालिका सोनाली रांजणे व उन्नती व उत्कर्ष परिवार संस्थापक-अध्यक्ष हनुमंत बळवंत रांजणे हे उपस्थित होते, तर संस्थेचे सचिव डी. के. जाधव, संचालक धोंडीराम जंगम, बी. व्ही. शेलार, तानाजी बाबर, व्ही. आर. उफाळे, आर. आर. जंगम, अजित आपटे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, दापवडीचे सरपंच महादेव रांजणे, माजी सरपंच संतोष रांजणे, मुख्याध्यापक डी. बी. आखाडे सर, शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या व्यासपीठासाठी शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. सोनाली हनुमंत रांजणे यांनी स्वखर्चातून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून व्यासपीठ तयार करून दिले. याबद्दल त्यांचा सपत्नीक असा मानपत्र, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळेच्या संस्कारावर आज समाजात मोठे झालो, त्या माउलीचे पांग फेडण्यासाठी नव्हे तर आपणही काहीतरी देणे लागतो या शुद्ध भावनेने आपण सढळ हाताने शाळेला मदतीचा खारीचा वाटा उचलला आहे, असे उदगार सोनाली रांजणे यांनी काढले.
सोनाली रांजणे यांनी शाळेसाठी मदतीचा घेतलेला निर्णय योग्य व स्तुत्य असून या व्यासपीठावरून राज्य व देश पातळीवरील वक्ते घडावेत, चांगले खेळाडू बनावेत आणी उत्तमोत्तम उत्तम विद्यार्थी तयार व्हावेत हीच आमची निर्मल अपेक्षा असून शाळेसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचे यावेळी हनुमंत रांजणे यांनी आपली भावना व्यक्त केली.
दापवडी हायस्कूलला दात्यांची कमतरता नाही पण माजी विद्यार्थी म्हणून सौ. सोनाली रांजणे यांनी व्यासपीठासाठी दिलेले योगदान संस्थेच्या कायम स्मरणात राहील. यापुढेही त्यांनी शाळेसाठी व शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठीच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा डी. के. जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी एम. जी. जाधव, पी. जे. कांबळे, डी. जी. नेवसे, वाय. बी. फरांदे, आर. एस. मापारी, एस. एच. जुनघरे, दापवडी, सदाशिव रांजणे, विलास रांजणे पाटील, तानाजी रांजणे, सुशिल गोळे, भरत रांजणे, सचिन रांजणे, संतोष शिराळे, सौ. मंदाताई रांजणे, नथुभाऊ रांजणे, पोलीस पाटील सुनिता रांजणे, बबन शिंदे, सरपंच सौ. संगीता शिराळे, संस्थेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यालयातील शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, दापवडी पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी विद्यालयातील विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
प्रस्ताविक व सूत्रसंचालन नितीन घाडगे यांनी केले. तर मुख्याध्यापक आखाडे डी. व्ही. यांनी आभार मानले.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!