मंथन राज्यस्तरीय परीक्षेत शौर्य बेलोशे याचे उज्वल यश


मंथन राज्यस्तरीय परीक्षेत

शौर्य बेलोशे याचे उज्वल यश

सातारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काटवली येथील इयत्ता २ री मधील विद्यार्थी कुमार शौर्य शामराव बेलोशे याने मंथन राज्यस्तरीय परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.


शौर्य याने मंथन परीक्षेत १५० पैकी १२८ गुण मिळवून जावली तालुक्यात प्रथम क्रमांक, जिल्ह्यात ७ वा, तर राज्यात १२ वा क्रमांक मिळवला आहे. तसेच अभिरूप परीक्षेतही त्याने घवघवीत यश मिळवले आहे.



या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली कदम व सहाय्यक शिक्षक श्री. प्रमोद शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले. या अभिमानास्पद यशामुळे काटवली गावासह जिल्हा परिषद शाळेचे नाव उंचावले आहे.



या यशामागे शिक्षणविस्तार अधिकारी मा. श्री. उस्मान मणेर, केंद्रप्रमुख मा. श्री. बाचल, शाळा व्यवस्थापन समिती, सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामपंचायत, युवक मंडळ व पालक यांचे एकत्रित प्रयत्न आहेत. शौर्य बेलोशे याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments