श्री घाटाई देवी यात्रास्थळाच्या
ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; अर्थसंकल्पीत निधीतून मिळवली मंजुरी
सातारा : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा तालुक्यातील घाटवण येथील श्री. घाटाई देवी देवस्थान ट्रस्ट यात्रास्थळाला ब वर्ग दर्जा मिळवून देणाऱ्या ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून श्री. घाटाई देवी यात्रास्थळाच्या सुशोभीकरणासह विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तब्बल २ कोटी ७६ लाख ४० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या तीर्थस्थळाचे रुपडे पालटणार असून भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण होणार आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे आभार मानले आहेत.
जगप्रसिद्ध कास पठार परिसरात असलेल्या घाटवण येथील घाटाईदेवीच्या यात्रेला दरवर्षी हजारो भक्त- भाविक येत असतात. यापूर्वी 'क' वर्ग दर्जा असल्याने या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मर्यादा येत होत्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे राज्याच्या ग्रामविकास विभागाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेतून घाटाईदेवी तीर्थक्षेत्राला काही दिवसांपूर्वीच ब वर्ग दर्जा प्रदान केला आहे. केवळ यावरच न थांबता या तीर्थस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून श्री. घाटाई देवी तीर्थस्थळाच्या सुशोभीकरणासह येथील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग सहायक अनुदाने (वेतनेत्तर) सन २०२६- २७ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत निधीतून २ कोटी ७६ लाख ४० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर निधीतून श्री घाटाई देवी देवस्थान ट्रस्ट यात्रास्थळ येथे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी, भोजन कक्ष बांधणे ५९ लाख ९० हजार, संरक्षक भिंत बांधणे २० लाख, महिला व पुरुष स्वच्छतागृह व स्नानगृह बांधणे ३० लाख, वाहनतळ करणे ५० लाख, विद्युतीकरण करण्यासाठी १६ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे तात्काळ सुरु करा. सर्व कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!