डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे ना. उदय सामंत यांना निमंत्रण


डिजिटल मीडिया संपादक

पत्रकार संघटनेच्या

राष्ट्रीय अधिवेशनाचे ना. 

उदय सामंत यांना निमंत्रण

कोल्हापुरात शिष्टमंडळाची भेट

कोल्हापूर : येत्या ४ मे २०२६ रोजी पणजी (गोवा) येथे आयोजित 'डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटने'च्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अधिकृत निमंत्रण राज्याचे उद्योगमंत्री नामदार श्री. उदयजी सामंत यांना देण्यात आले. कोल्हापूर दौऱ्यावर असताना मंत्री उदय सामंत यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यांना अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डिजिटल मीडियाच्या क्षेत्रातील वाढते महत्त्व आणि पत्रकारांचे प्रश्न यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सायली मराठे, शहराध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला आणि सहसचिव इंद्रजीत मराठे उपस्थित होते. या शिष्टमंडळाने गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीबाबत आणि त्यातील नियोजित सत्रांबाबत मंत्रीमहोदयांना माहिती दिली.

मंत्री उदय सामंत यांनी हे निमंत्रण स्वीकारून डिजिटल मीडियाच्या वाटचालीबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या. संघटनेच्या या उपक्रमाचे स्वागत करत त्यांनी अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments