साताऱ्यात लोहार-सुतार
समाजाचा मंगळवारी मेळावा
समाजाच्या न्याय हक्कासाठी कोअर कमिटी घटना समितीची करण्यात येणार स्थापना
सातारा, दि. २७ (प्रतिनिधी) : श्री विश्वकर्मा लोहार-सुतार समाजाच्या उज्वल भविष्यासाठी व सामाजिक न्याय हक्क मिळवण्यासाठी मंगळवार, दि. 31 मार्च रोजी कोअर कमिटी घटना समिती स्थापनेच्या निमित्ताने सुरभी मंगल कार्यालय, बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा येथे लोहार-सुतार समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लोहार-सुतार समाज बांधव एकत्रित येऊन समाजाचा नावलौकिक व समाजात असलेली दुरावस्था दूर करण्याच्या दृष्टीने कोअर कमिटी घटना समितीची स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी निर्णय अधिकारी म्हणून सातारा जिल्हा सभापती अप्पासाहेब सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटी घटना समिती 2026 ची स्थापना करून घोषणा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो लोहार-सुतार समाज बांधव उपस्थित राहणार आहे, अशी माहिती लोहार सुतार समाजाचे बांधव श्री. अंकुश लोहार, ॲड. गणेश लोहार, श्री. अनिल लोहार यांनी दिली.
लोहार-सुतार समाज बांधवांनी पत्रकात म्हटले आहे की, गावगाड्यातील सेवेकरी लोहार, सुतार, बलुतेदार, आलुतेदार समाज तुटपुंजा मानधनावर आपली सेवा बजावत आहेत. मुला-मुलींची शैक्षणिक, शासकीय योजनांपासून वंचित राहत आहे. त्यामुळे समाजाच्या आर्थिक विषमतेत वाढ होत दुर्बल होत आहे. समाजात प्रगतीच्या वाटा बंद होत चालल्याचे चित्र दिसत आहे. सध्या यांत्रिकी युगात आर्थिक दुर्बलतेमुळे समाज पारंपारिक लोहार, सुतारकाम गुंतला गेला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक मागासलेपणामुळे दुर्बलतेची सामाजिक दरी निर्माण झाले असून, युवकांच्या हाताला काम, नोकरी नाही. त्यामुळे त्यांच्या विवाहाचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. बेरोजगार झालेली असंख्य कुटुंबे जिल्ह्यात आहेत. आज खऱ्याअर्थाने ही परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. इतर समाजाबरोबर ताठ मानेने जगण्यासाठी समाजकारण, राजकारणातील मागासलेपण दूर कारणे, समाजातील मुला-मुलींना शैक्षणिक सुविधा, माता भगिनींना व्यवसायाशी निगडित उद्योग देणे, आर्थिक, शैक्षणिक, बेरोजगारीदृष्ट्या मजबुतीकरण करून घेणे, श्री विश्वकर्मा योजना जिल्ह्यात लोहार सुतार समाजासाठी कार्यान्वित करणे, श्री विश्वकर्मा महाराष्ट्र शासन निर्मित आर्थिक विकास महामंडळ शासन दरबारी पाठपुरावा करून जिल्ह्यात अध्यक्ष, संचालकपदी नेमणूक घेऊन जिल्ह्यात कार्यान्वित करून घेणे, सातारा जिल्ह्यातील लोहार-सुतार समाज बांधव जनगणना करणे, तसेच भेदभाव विरहित बंधुत्व नाते निर्माण करणे, शासन दरबारी समस्या मांडून योग्यरीत्या शासन व समाज बांधवांचा दुवा निर्माण करणे, सामूहिक वाद चर्चा करून तडजोडीतून सोडवणे, बेरोजगारीचा स्तर कमी करून आत्मनिर्भरतेचे प्रशिक्षण देणे, व्यवसाय निर्मिती करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा पतपुरवठा करणे, व्यथा मांडून आर्थिक निकष वाढवून घेणे, आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र दर्जा देऊन 100 कोटी ते 200 कोटीचा निधी संचालक मंडळावर करून घेणे, समाज कृती नियुक्ती सारथी महाज्योतीच्या धर्तीवर श्री विश्वकर्मा कौशल्य विकास व प्रशिक्षण संस्था स्थापन करणे, समाजाच्या न्याय हक्काचा लढा उभारणे व मूळ उद्दिष्ट साध्य करणे, ओबीसी मागासवर्गीय आरक्षणाचे उपवर्गीकरण करून समाज दुर्बलता घटविण्यासाठी श्री विश्वकर्मा बलुतेदारांना 5% टक्के आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, प्रलंबित न्याय मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करणे, लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून प्रलंबित हक्क मिळवून न्यायप्रविष्ठ करून घेणे, हे मुख्य उद्दिष्ट घेऊन प्रथमच सातारा जिल्ह्यात कोअर कमिटी घटना समिती स्थापना करून वाटचाल करीत आहे.
तरी सर्व लोहार सुतार समाज बांधवांनी मंगळवार, दि. 31 मार्च रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाबळेश्वर ओबीसी बहुजन संघटना अध्यक्ष, श्री विश्वकर्मा पंचक्रोशी लोहार सुतार विकास सेवा ट्रस्ट संस्थापक अनिल लोहार यांनी केले आहे.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!