दिव्यांग लाभार्थ्यांनी
युडीआयडी कार्ड काढून
कार्यालयात वेळेत जमा करावे
जावळीचे तहसिलदार प्रविण मुदगुल यांचे आवाहन
सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (युडिआयडी कार्ड) काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी आपले युडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करून आवश्यक कागदपत्रे संजय गांधी शाखा तहसिल कार्यालय जावळी (मेढा) येथे जमा करावीत, असे आवाहन तहसिलदार प्रविण मुदगुल यांनी केले आहे.
तहसीलदार मुदगुल म्हणाले, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनामधून सर्व दिव्यांग लाभार्थीना यापूर्वी 1500 रुपये इतके अनुदान दिले जात होते शासन निर्णय क्र. विसयों 2025/प्र.क्र.69/विसयो दि. 15 सप्टेंबर, 2025 अन्वये माहे आक्टोंबर 2025 पासून दिव्यांग लाभार्थीचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 रुपयांवरून दरमहा रुपये 2500 रुपये करण्यास शासन मान्यतालक देण्यात आलेली आहे.
या पेन्शन वाढीचा लाभ दिव्यांग लाभार्थीना मिळण्यासाठी DBT (Direct Beneficiary Transfer ) मध्ये युडीआयडी (UDID) कार्डचा नंबर नमूद करणे आवश्यक आहे. या कार्डचा उपयोग दिव्यांग व्यक्तींसाठी एकच राष्ट्रीय ओळखपत्रासाठी तसेच इतर सर्व सरकारी योजना व सवलतींसाठी एकसंध दस्तऐवज असल्याने विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार दिव्यांग प्रमाणपत्र दाखवावे लागू नये यासाठी अव्दितिय दिव्यांग ओळखपत्र (UDID) कार्ड काढणे आवश्यक आहे. त्याशिवाय या पेन्शन वाढीचा लाभ तसेच दिव्यांग लाभार्थीना मिळणारे इतर लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे जावली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनामधून लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थीकडे युडी आयडी (UDID) कार्ड आहे अशा दिव्यांग लाभार्थीनी युडीआयडी (UDID) कार्डचा नंबर DBT मध्ये नमूद करण्यासाठी युडीआयडी (UDID) कार्डची छायांकित प्रत व आधारकार्डची छायांकित प्रत संजय गांधी शाखा तहसील कार्यालय जावली (मेढा) मध्ये जमा करावी.
जे दिव्यांग लाभार्थी युडीआयडी (UDID) कार्डचा नंबर किंवा कार्ड जमा करणार नाहीत ते माहे एप्रिल 2026 पासून निवृत्तीवेतन लाभापासून वंचित राहू शकतात, तसेच ज्या दिव्यांग लाभार्थीने अद्याप युडीआयडी (UDID) कार्ड काढलेले नाही अशा दिव्यांग लाभार्थीने जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी दिलेल्या खालील वेळापत्रकानुसार अस्थिव्यंग (Locomotor Disability) असणाऱ्या दिव्यांग लाभार्थीनी जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी नेमून दिलेल्या वाराच्या दिवशी व वेळी उपस्थित राहून एक महिन्याच्या आत युडी आयडी (UDID) कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार प्रविण मुदगुल यांनी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!