पाचवड- पाचगणी रस्त्यावरील
पूल, डांबरीकरण कामाच्या
दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
नवीन पूल बांधकाम व डांबरीकरणाची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणीची नागरिकांकडून मागणी
करहर : जावळी तालुक्यातील पाचवड- पाचगणी रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलांची व खडीकरणासह डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्ता कामाची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
काटवली, बेलोशी, करहर, कुडाळी नदीवरील महु कुंडी येथील पूल व पानस फाटा, टोम्पेवाडी ते वहागाव त्याचप्रमाणे रांजणी (राघववाडी) ते बेलोशी या रस्त्याचे रुंदीकरण नव्यानेच करण्यात आलेले आहे. या रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहता आगामी पावसाळ्यात हा रस्ता तग धरून राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या रस्त्यांची व पुलांची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करून याबाबतचा अहवाल जनतेसमोर सादर करावा. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराने घ्यावी,अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!