ज्येष्ठ समाजसेवक
तुकाराम गोळे-पाटील यांचे
वृद्धापकाळाने निधन
जावली : हातगेघर (ता. जावली) येथील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक तुकाराम खंडू गोळे-पाटील (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते भारतीय जनता पार्टीचे माजी जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांचे वडील होत.
'तुकाराम पाटील' नावाने पंचक्रोशीत त्यांची ओळख आणि दबदबा होता. स्पष्टवक्तेपणा, कडक स्वभाव व शिस्तप्रियता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सर्वांच्या परिचयाची होती. तुकाराम गोळे यांच्या निधनामुळे हातगेघर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रदीर्घ काळ समाजसेवेसाठी दिला.
हातगेघर गावचे माजी सरपंच, सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. सलग १७ वर्षे गावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी वनिता, मुलगा श्रीहरी, दोन विवाहित मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन विधी मंगळवार, दि. ३ मार्च रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत हातगेघर येथे होणार आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!