पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा


पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा

सेवानिवृत्त जवानाने दिली खून केल्याची कबुली

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाडळी येथील संभाजी बाळू शेलार (वय ४३) या बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांना यश आले आहे.

सेवानिवृत्त जवानाने पैशाच्या कारणावरून चाकूने वार करत खून केल्याचे कबूल केले आहे. तसेच खुनानंतर मृतदेह एक रात्र घरातच जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

पाच महिन्यानंतर भरत उर्फ मधू रंगराव ढाणे (वय ४८, रा. पाडळी ता. जि. सातारा) या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. संभाजी शेलार हे कोणास काही न सांगता निघून गेल्याची मिसिंगची तक्रार त्यांची बहीण बेबी सुनील माळी (रा. हजारमाची, ता. कराड) यांनी बोरगाव पोलिसांत दिली होती.

Post a Comment

0 Comments