म्हसवडमध्ये शेखर गोरे यांचे शक्ती प्रदर्शन
दमदार एन्ट्रीत थेट नगराध्यक्षपदासह अन्य तीन प्रभागात ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
म्हसवड : नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधुम सुरु असुन युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी म्हसवड मध्ये मोठे शक्ती प्रदर्शनासह दमदार एन्ट्रीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी आपल्या गटाचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
म्हसवड पालिका निवडणुकीत आजपासुन सुरुवात झाली शेखर गोरे यांनी ही निवडणुक कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निर्धार करीत निवडणुकीच्या या आघाड्यात रॉयल एन्ट्री करीत थेट नगराध्यक्ष पदासह अन्य तीन प्रभागात ६ उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
शेखर गोरे माणच्या राजकारणातील एक वादळ म्हणुन संबोधले जाते, पालिका निवडणुक जाहीर झाल्यापासुन सर्वांचेच लक्ष हे शेखर गोरे यांच्या भुमिकेकडे लागलेले होते ते कोणती भुमिका घेतील यावर येथील राजकिय समिकरणे ठरत असल्यानेच प्रत्येकाचे लक्ष शेखर गोरे यांच्याकडे लागले होते. एकीकडे भाजप व विरोधी गटाचे उमेदवारांचे समीकरण जुळेना असे चित्र असताना शेखर गोरे यांनी अचानक म्हसवडच्या राजकारणात धडाकेबाज एन्ट्री करीत पहिल्या टप्प्यात ७ उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी येथील माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई सौ. गौरी विशाल माने यांचा अर्ज दाखल केला आहे, तर इतर प्रभागातुनही आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत, यामध्ये प्रभाग क्र. १ मधुन सोमनाथ अजिनाथ कवी, प्रभाग क्र. २ ट मधुन किर्ती आनंदा मासाळ व त्याच प्रभागातुन त्यांचे पती आनंदा महादेव मासाळ, प्रभाग क्र. ३ विक्रम लोखंडे, प्रभाग क्र. ५ मधुन मोनिका महेश लिंगे, प्रभाग क्र. ७ मधुन प्रतिक्षा सोमनाथ कवी, प्रभाग क्र. ८ मधुन धनाजी रामचंद्र माने अशा ७ सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम सुरु होवुन चार दिवस लोटले असुन मा ४ दिवसांत कोणत्याच राजकिय पक्ष व आघाडीकडुन उमेदवार अर्ज दाखल झालेले नव्हते मात्र आजपासुन निवडणुकीला रंग भरायला सुरुवात झाली आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!