सातारा नगरपालिकेत
महिला राखीव जागेवर
पुरुषाचे नामनिर्देशन पत्र दाखल
छाननीतही अर्ज वैध; राजकीय क्षेत्रात एकच खळबळ
सातारा : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून या जागेवर एका पुरुषाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज छाननीतही हा अर्ज वैध झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे. या जागेसाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ महिला असून त्यात एका पुरुषाचा उमेदवार अर्ज दाखल झाल्याची बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरपालिका प्रभारी यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमके करत होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यातच आजच सर्व उमेदवारांची प्रभाग निहाय छाननी झाली आहे. मात्र, या छाननीमध्ये ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्याने नेमकी चूक कोणाची झाली? हा प्रश्न निर्माण झाला आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!