.... तर ही कसली अभद्र युती म्हणायची..! आ. अतुल भोसले




...तर ही कसली अभद्र युती

म्हणायची! आ. अतुल भोसले

कराड : महायुती सातारा जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा व महायुतीतील घटक पक्षांची व्हावी, अशी इच्छा आहे.

पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी महायुती न होतानादेखील दिसते. पण माझा प्रयत्न आहे की शेवटच्या घटकापर्यंत आपण प्रयत्न करावा की महायुती व्हावी. 

ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग ज्या त्या ठिकाणच्या नेतृत्वासाठी खुला आहे. 

आमचा प्रयत्न आहे की निदान कराडमध्ये महायुती करता येते का! शेवटी दोन्ही बाजूची मागणी दोन्ही बाजूला मान्य झाली, तर महायुती होऊ शकते

समविचारी नाही आहेत ती समदुखी लोक आहेत. ज्यांना सत्तेमध्ये कुठे स्थान मिळू शकत नाही, अशी लोक फक्त भाजपा मोठा होतोय या असूयपोटी कोण एकत्र होऊ शकते का? हा त्यांचा प्रयत्न आहे.

महायुतीमधले घटक पक्ष जर महाआघाडीमधील लोकांना घेऊन जर लढत असतील तर ही कसली अभद्र युती म्हणायची..!

Post a Comment

0 Comments