"सह्याद्री"च्या कार्यक्षेत्रात
परवानाधारकांसह इतरांना
शस्त्र मिरवणे पडू शकते महागात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलम 163 नुसार तरतुदी लागू : जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा : कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता.कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी मतदान, तर मतमोजणी 6 एप्रिल रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुका हद्दीत सह्याद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उक्त नमुद केलेल्या तालुका हद्दीतील शस्त्र परवानाधारकांनी रहात असलेल्या घराच्या बाहेर शस्त्र घेवून बाहेर पडण्यास तसेच वरील तालुक्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रासह वर नमूद तालुक्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू केले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!