प्लॅट खरेदी देतो सांगून
22 लाख रुपयांची फसवणूक
शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ; सल्लाउद्दीन काझी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल
म्हसवड : प्लॅट खरेदी देतो, अशी बतावणी करत 22 लाख रुपये घेऊन बांधकाम पूर्ण न करता ठरल्या व्यवहाराप्रमाणे न वागता खोटी कागदपत्रे दाखवून फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील सल्लाउद्दीन जमिरुद्दीन काझी यांच्यावर म्हसवड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी सल्लाऊद्दिन काझी यांस पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की,
दि. 26/10/2015 ते ता. 27/02/2025 रोजी म्हसवड (ता.माण) गावच्या हद्दीत सिटी सर्व्हे नं.396/4 मधील पालिका हद्दीतील जागेत बांधकाम सुरू असताना प्लॅट नंबर 3 येथील शिक्षक राजू उर्फ राजाराम गोरख पवार (वय 52) यांनी सल्लाउद्दीन जमिरुद्दीन काझी
यांच्याकडून 22 लाख देऊन खरेदी करण्याबाबतचे करार केले होते. परंतु बांधकाम पूर्ण न करता ठरल्या व्यवहाराप्रमाणे न वागता मला खोटी कागदपत्रे दाखवून मी बौद्ध जातीचा असल्याबाबतची माहिती असूनही माझी फसवणूक केली. या फसवणूक केलेल्या रक्कमेबाबत व प्लॅटबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता त्याने मला "महारांना प्लॅट देत नाही मी, तुमची लायकी आहे का प्लॅट घेण्याची" असे बोलून मला जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत राजू उर्फ राजाराम गोरख पवार यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात सल्लाउद्दीन जमिरुद्दीन काझी यांच्याविरुद्ध तक्रार केली.
या तक्रारीनुसार सल्लाऊद्दिन काझी यांच्यावर फसवणूक व जातिवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
तपासी अधिकारी दहिवडी उपविभागिय अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. वाघमोडे करीत आहेत.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!