तब्बल पाच किलोमीटर पाठलाग करून दारू विक्री करणाऱ्या संशयितास अटक

 


म्हसवड : देशी, विदेशी, हातभट्टी आदी प्रकारची दारु व ताडी सह जप्त केलेल्या स्कूटी वाहन समवेत म्हसवड पोलिसांचे पथक.

तब्बल पाच किलोमीटर पाठलाग

करून दारू विक्री करणाऱ्या

संशयिताला अटक

देशी, विदेशी, हातभट्टी दारू, ताडी व वाहनासह जप्त

म्हसवड पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई

म्हसवड : तब्बल पाच किलोमीटर पाठलाग करून लाखो रुपयांची देशी, विदेशी, हातभट्टी आदी प्रकारची दारू व ताडी वाहनासह जप्त करून म्हसवड पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस पथकासमवेत ही कारवाई केली गेली.

हिंगणी (ता.माण ) गावच्या हद्दीत संशयित आरोपी तातोबा लक्ष्मण सरतापे हा ताडी व हहातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री करत असल्याची माहिती मिळताच सरतापे यांच्या राहत्या घराच्या आडोशाला छापा टाकून टाकून त्याच्याकडून ताडी व गावठीदारू जप्त केली गेली.

या बरोबरच पोलिस पथक गस्त करीत असताना एक संशयीत त्याच्या मोटरसायकलवरून दहिवडी ते म्हसवड जाणाऱ्या रस्त्यावरून बेकायदा बिगर परवाना देशी, विदेशी दारूची वाहतूक करत असल्याचा त्याच्यावर संशय आल्याने त्याला थांबण्याचा इशारा करून देखील तो न थांबल्याने अधिक संशय बळावला आणि त्याचा सुमारे पाच किलोमीटर पाठलाग करून संशयित पकडल्यानंतर त्याने त्याचे नाव पोपट पांडुरंग शिंदे रा. पानवण ( ता.माण ) येथील असल्याचे पोलिसांना सांगितले.

त्याच्याजवळील पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारू, विदेशी दारू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या दोन्ही संशयित आरोपींवर म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कार्यवाही करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, मैना हांगे,सुरेश हांगे, नितीन निकम, संजय आस्वले, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलाणी, संतोष काळे आदी पोलिसांनी केली.

Post a Comment

0 Comments