भाजपा एक परिवार, भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

 


भाजपा एक परिवार, भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले


भाजपा स्थापना दिनाच्या कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा..!


सातारा : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्ताने आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल सातारा शहरामध्ये आयोजित कार्यक्रमात नामदार श्री. छ. शिवेंद्रराजे उपस्थित राहिले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.



सहा एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. स्थापनेनंतरचा खडतर काळ आणि आत्ताच्या काळामध्ये केलेली कामे याविषयी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचा झेंडा उभारून त्याला वंदन केले. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारत माता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.



भारतीय जनता पार्टीची स्थापना, इतिहास आणि कार्य विस्तार त्याचप्रमाणे 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले काम तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले काम याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी सर्वांच्या बरोबर बसून मान्यवर, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन पाहिले.



भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. यामध्ये प्राथमिक सदस्य अभियान राबवले गेले. मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट दिले होते, ते पूर्ण झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून प्राथमिक सदस्यांचे स्वागत केले.



यावेळी विधानसभा निवडणूकप्रमुख अविनाश कदम, भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, सुनील काळेकर, महिला मोर्चा सातारा शहर अध्यक्ष रीना भणगे, वैष्णवी कदम, रोहिणी क्षीरसागर, संगीता जाधव, अंजली त्रिंबके, नितीन कदम, प्रवीण शहाणे, चंदन घोडके, विक्रम बोराटे, अविनाश खर्शीकर, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. सचिन भोसले, कुणाल मोरे, मंगेश गोगावले, अमोल टंगसाळे, दीपक क्षीरसागर, गजेंद्र ढोणे, युवराज मोरकर, नितीन बर्गे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments