एकनाथ शिंदे यांच्याशी माझे
संबंध चांगले : उपमुख्यमंत्री
अजित पवार यांचे स्पष्टीकरण
सातारा : एकनाथ शिंदे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. त्यांना काही सांगायचे असेल, तर ते माझ्याशी स्वत: बोलू शकतील. ते तिकडे तक्रार करतील असे वाटत नाही. मुख्यमंत्री आणि आम्ही दोघे आठवड्यातून एकत्र बसून चर्चा करत असतो. सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयाबाबत चर्चा करून मार्ग काढत असतो, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याच्या फाईल संदर्भात तक्रार केली असल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्था ही बहुजन समाजाच्या मुलांसाठी कर्मवीर अण्णांनी काढली असून साडेचार लाख विद्यार्थी आज शिकत आहेत. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना उदयास आली आहे. या अनुषंगाने मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा झाली. तसेच रयत संस्थेशी निगडीत जवळपास २५ विषयांवर चर्चा करण्यात आली. मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, कृत्रिम बुद्धीमत्ता संकल्पना सुविधा कशा देता येतील? याबाबतचा कृती आराखडा आज बैठकीत ठरला.
अर्थखात्याच्या फायली प्लेयर होत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली असल्याचा विचारले असता अजित पवार म्हणाले, याबाबत अमित शहा काहीही बोलले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार आता सांगू नका. मी सकाळपासून अमित शहा यांच्यासाेबत होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी माझे संबंध चांगले आहे. त्यांना काही सांगायचे असेल, तर ते माझ्याशी स्वत: बोलू शकतील. ते तिकडे तक्रार करतील असे वाटत नाही. मुख्यमंत्री आणि आम्ही दोघे आठवड्यातून एकत्र बसून चर्चा करत असतो. सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयाबाबत चर्चा करून मार्ग काढत असतो.
रायगडच्या पालकमंत्रीबाबत काहीही चिंता करण्याचे कारण नाही. यावर्षीचा रायगड जिल्हा नियोजन समितीचा आराखड्यातील मंजूर निधीही दिला आहे.
जिल्हा परिषदेची पटसंख्या कमी होऊ लागल आहे. यासंदर्भात गुलाबराव पाटील यांनी जसे आम्ही पक्ष फोडले तसे मुलेही फोडा असे विधान केले हाेते. यासदंर्भात अजित पवार म्हणाले, राज्यातील गोरगरिबांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांचे योगदान नाकारता येणार नाही. नाशिक जिल्ह्यात काही शाळा अशा आहेत, तेथील शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवत असल्याने तेथे प्रवेशासाठी रांगा लागतात. याचे अनुकरण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कार्यक्रम हाती घेतला आहे. शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी सेमी इंग्रजी सुरू केले आहे. नगरपालिका, नगरपंचायत आणि काही जिल्हा परिषदेच्या काही शाळात सीबीएसई शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी तशा शाळाही सुरू आहेत. इंग्रजीमधून शिक्षण देण्यासाठी आग्रही असणारा पालकवर्ग मोठा आहे. यावेळी गुलाबराव पाटील आमचे सहकारी आहेत. ते काय बोलले याची त्यांच्याकडून नक्की माहिती घेतो, असेही पवार म्हणाले.
रायगडावर बाेलू न दिल्याचे माहिती खोटी असल्याचे सांगून अजित पवार म्हटले, की कार्यक्रमाला उशिर झाल्यामुळे मीच मुख्यमंत्री आणि अमित शहा यांना बोलण्यास सांगितले. राज्याच्या वतीने मुख्यमंत्री बोलले तर आम्ही बोलण्यासारखेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. गडकिल्ल्यांचे काम, समुद्रात भव्य स्मारक करण्याचा प्रश्न प्रलंबित याबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असल्याचे अजित पवार म्हणाले. पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार रायगडाचे काम सुरू असल्याने विलंब लागत असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!