बाळासाहेब, सह्याद्रीच्या
विजयाचे पेढे कुठे आहेत?
ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांचा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना मिश्किल सवाल
सातारा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजप सातारा जिल्ह्याचा किंगमेकर झाला, तर पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुरता ढासळून गेला आहे. सततच्या पराभवाने ग्रासून गेलेली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत विजयामुळे पुन्हा ताकदीने उभी राहू लागली आहे.
सह्याद्रीच्या याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शनिवारी सातारा दौऱ्यावर होते. सैनिक स्कूलच्या मैदानावर शरद पवारांचे हेलिकॉप्टर उतरले. या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या पी. डी. पाटील पॅनलचे प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी हेलीपॅडवर पवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तेव्हा बाळासाहेब सह्याद्रीत मिळवलेल्या विजयाचे पेढे कुठे आहेत? असा मिश्किल प्रश्न पवारांनी बाळासाहेबांना केला. तेव्हा साहेब पेढे घेऊनच आलो आहे, असे बाळासाहेब हात जोडतच म्हणाले. या स्वागत सोहळ्यावेळी पवारांसह सर्वजण हास्य विनोदात रंगले. या दोन्ही नेत्यांतील संवाद फेकीला उपस्थितांनीही हसून दाद दिली.
यावेळी आ. शशिकांत शिंदे, प्रदेश प्रवक्ते सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, विजयराव बोबडे, संगीताताई साळुंखे, शफिक शेख आदी उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!