"किसन वीर'च्या उभारणीत ना. मकरंदआबा पाटील आपणही साथ द्यावी : प्रमोद शिंदेंचे आवाहन

 


'किसन वीर'च्या उभारणीत

ना. मकरंदआबा पाटील

यांना आपणही साथ द्यावी


प्रमोद शिंदेंचे आवाहन, तोडणी वाहतूक करारास प्रारंभ


भुईंज : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री व किसन वीरचे चेअरमन मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची विस्कटलेली घडी बसविण्यात मागील तीन वर्षामध्ये यशस्वी झालो आहोत. गळित हंगाम २०२५-२६ मध्येही आपण सर्वांनी यापूर्वीपेक्षाही अधिक जोमाने साथ देऊन किसन वीरच्या उभारणीत ना. मकरंदआबांना साथ द्यावी, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले.



सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतूक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरूपात अविनाश सावंत, आदिक ढाणे, पंडित शिंदे, सुभाष खेडेकर, नितीन जायकर या ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी करार केले. यावेळी शिंदे बोलत होते.


प्रमोद शिंदे म्हणाले, की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या प्रमाणे दर देण्याचा प्रयत्न केला, त्याचपद्धतीने आम्ही तोडणी वाहतूक कंत्राटदार, मशिन मालक, बैलगाडी कंत्राटदार यांनाही दर देण्यात कमी पडलो नाही. मागील वर्षी आमच्या व्यवस्थापनाने स्थानिक वाहतूक कंत्राटदारांना प्रत्यक्ष भेटून करार करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये आम्ही बहुतांशी यशस्वीही झालो. सन २०२५-२६ गळित हंगामातही आपण इतर कारखान्यांप्रमाणे तोडणी वाहतूक कंत्राटदारांना अ‍ॅडव्हान्स देणार आहोत. तोडणी वाहतूक कंत्राटदारांना येणाऱ्या अडचणींचाही निपटारा येणाऱ्या सीझनमध्ये करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तोडणी वाहतूक कंत्राटदारांबरोबर कोणत्याही प्रकारचे राजकारण कारखान्यामध्ये केले जात नाही. अडीअडचणीच्या काळामध्ये सर्वांना मदत केलेली आहे. यापुढील काळातही सर्व वाहतूकदारांनी केलेल्या कराराप्रमाणे वाहने आणून कारखान्यास सहकार्य करावे. आपले सर्वांचे किसन वीर कारखान्याशी भावनिक नाते असून आपणही कारखान्याचा उभारीत ना. मकरंदआबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळास साथ देण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी यावेळी केले.


कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी आपल्या मनोगतामध्ये ऊस नोंदीबद्दल माहिती देत गाळप कोण करेल तर ज्याच्याकडे जास्त यंत्रणा आहे तोच कारखाना गाळप करेल. त्यामुळे तोडणी वाहतूक यंत्रणेने मागील सिझनप्रमाणे याही वर्षी कारखान्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी तोडणी वाहतूक कंत्राटदार यांनी आपल्या अडीअडचणी विशद केल्या. या सर्व अडीअडचणी दूर करण्याबाबत संबंधितांना सूचना देऊन त्यावर मार्ग काढण्याबाबत व्यवस्थापनाने आश्वासित केले.


यावेळी कारखान्याचे संचालक हिंदूराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, संचालक चंद्रकांत ढमाळ, बाळासो वीर, तोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन बबनराव साबळे, व्हाईस चेअरमन अजय कदम, मानसिंग साबळे, चंद्रकांत फडतरे, शशिकांत भोईटे, शामराव गायकवाड, बी. आर. सावंत, विश्वास डेरे, शेती अधिकारी शंकर कदम व विठ्ठल कदम, प्रदीप अहिरेकर, विक्रांत फडतरे, गणेश संकपाळ, गुरूप्रसाद हार्वेस्टर, सुरेश घाटे, किरण सावंत, गणेश पिसाळ, तेजस सावंत, संतोष ढाणे, किशोर जाधव, मोहन डेरे, समीर महांगडे, अमोल शिंदे, शंकर माने, भरत आसबे, संदिप शिंदे, प्रकाश शिंगटे, दत्तात्रय औटे, तोडणी वाहतूक कंत्राटदार, मशिन मालक, बैलगाडी कंत्राटदार बहुसंख्येने हजर होते.

Post a Comment

0 Comments