...तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार : आमदार मनोज घोरपडे


 ... तर मी आमदारकीचा

राजीनामा देण्यास तयार 

आमदार मनोज घोरपडे यांचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना आव्हान 

सातारा : सह्याद्री साखर कारखान्याचे ९ हजार सभासद आजही वारस नोंदीपासून वंचित आहेत. ते बॅलेट पेपरचे बोलत आहेत, त्यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी ९ हजार सभासदांच्या वारस नोंदी करून निवडणूक घ्यावी. तसे केले तर मीही आमदारीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे. त्यामुळे सहकारातील निवडणुकीचे संदर्भ आणि सार्वत्रिक निवडणुकांचे संदर्भ वेगळे असतात. परंतु, विरोधकांनी विनाकारण काहूर माजवले आहे, असा टोला आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांना लगावला.

आमदार मनोज घोरपडे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्या मध्येमधील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलचा विजय झाला. तो आम्ही मान्यही केला. पण, संपूर्ण महाराष्ट्र जिंकल्याच्या अविर्भावात महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांच्याकडून बॅलेट पेपरवर मतदान झाले, की निकाल आमच्यासारखा येतो, असा मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला जात आहे. खरं तर सहकारातील निवडणूक ही कुठलाही राजकीय पक्ष म्हणून लढली गेली नव्हती. खरं तर सह्याद्री कारखान्याची सत्ता सलग ५३ वर्षे एकाच कुटुंबाकडे आहे. विधानसभेला निवडून आल्यानंतर सभासदांनी न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली. प्रसार माध्यमांकडून हा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळी राजकारणातील विकेंद्रीकरणाचा विचार यशवंतराव चव्हाण यांनी राज्यासह जिल्ह्याला दिला आहे. त्या माध्यमातून सर्वसामान्य सभासदाला कारखान्याचा अध्यक्ष करण्याची भूमिका मी जाहीर केली. मी भूमिका जाहीर केल्यानंतर सह्याद्रीच्या अध्यक्षांनी साखर मोफत देऊ, असे आश्वासन दिले. गेल्यावर्षी याच साखरेचा दर सात रुपयांवरून दहा रुपये असा वाढवला होता. त्यामुळे सभासदांना न्याय मिळालेला आहे. सहकारातील सभासद अशा पद्धतीने केले जातात, की कोणाला मतदानाचा अधिकार द्यायचा, हे संचालक मंडळ ठरवते. निवडक लोकांनाच सभासद केले जाते. सह्याद्रीचे ९ हजार सभासद आजही वारस नोंदीपासून वंचित आहेत. ते बॅलेट पेपरचे बोलत आहेत, त्यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी ९ हजार सभासदांच्या वारस नोंदी करून निवडणूक घ्यावी. तसे केले तर मीही आमदारीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे. त्यामुळे सहकारातील निवडणुकीचे संदर्भ आणि सार्वत्रिक निवडणुकांचे संदर्भ वेगळे असतात. परंतु, विरोधकांनी विनाकारण काहूर माजवले आहे, असा असा टोलाही आ. घोरपडे यांनी लगावला.


कारखान्याच्या ९ हजार सभासदांच जवळच्याच लोकांच्या वारसनोंदी केल्या आहेत. साडेनऊ हजार नोंदी केल्या, तर निकाल काय लागू शकतो. हे सर्व सभासद त्यांनीच केलेले आहेत. त्यातील दहा हजार सभासदांनी त्यांच्या विरोधात कौल दिला आहे. शिवाय मतदार कोण हे कोण ठरवतात. शिवाय कडेपूर, कडेगाव, कऱ्हाड दक्षिण, खटाव येथील सभासद कऱ्हाड उत्तरचा मतदार नाही. त्यामुळे हूरळून जाण्याची गरज नाही. सहकारात निवडणूक लावणे हीच मोठी गोष्ट आहे. त्यांच्याविरोधात १७० अर्ज आले होते. आम्ही सभासदांसाठी लढतो तर अध्यक्ष स्वत:च्या कुटुंबासाठी लढले, असा आरोपही आमदार मनोज घोरपडे यांनी केला.

Post a Comment

0 Comments