म्हसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका

 


म्हसवड पोलिसांचा अवैध

धंद्यांवर कारवाईचा धडाका


म्हसवड : सातारा जिल्ह्यातील म्हसवड पोलिस ठाणे हद्दीत दारू, जुगार आणि मटका अशा अवैध धंद्यांवर पोलिसांनी धापे टाकून करून तब्बल 6 गुन्हे दाखल करून 12 आरोपींवर अटकेची कारवाई मटका घेणाऱ्या लोकांसोबत मटका व्यवसायाचा मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला. म्हसवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलिसांसमवेत दमदार कामगिरी करून अवैध धंद्यांचे एकाच दिवसात कंबरडे मोडले.


याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्हसवडसह पोलिस ठाणे हद्दीतील हिंगणी राजेवाडी रोडजवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेणाऱ्या, विरळी येथे मटका घेणाऱ्या, विरळी येथे जुगार पत्ते खेळणाऱ्यांना, त्याचबरोबर मासाळवाडी हद्दीतील मोदी ढाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या, तसेच जय मल्हार ढाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या, ढाकणी येथे दारू विकणाऱ्या, तब्बल 12 आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आलेली आहे. 


मटका घेणारे व त्यांचे मालक संशयित आरोपींची नावे खालीलप्रमाणे काकासो आगतराव जाधव, बाळासाहेब रामचंद्र पानसांडे, कल्याण आण्णा ओहाळ, प्रियंका रामचंद्र भंडारे.


जुगार पत्ते खेळणारे संशयित आरोपींची नावे अशी बबन उमाजी काळेल, बापू विठोबा वाघमारे, उद्धव सिताराम यादव, भानुदास तुळशीराम काळेल, बाबा बबन धुमाळ.


दारूविक्री करणारे संशयित आरोपी नवनाथ महादेव मासाळ, संजय सुखदेव कोडलकर, तातोबा गोजाबा कांबळे अशी नावे आहेत. 

वरील सर्व संशयित आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, यापुढेदेखील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा चालूच राहणार आहे. ही कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.



सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस अंमलदार देवानंद खाडे, भगवान सजगणे, शशिकांत खाडे, रूपाली फडतरे, निता पळे, मैना हांगे, अमर नारनवर, सुरेश हांगे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, विकास ओंबासे, अनिल वाघमोडे, युवराज खाडे, राहुल थोरात आदी पोलिसांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments