जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप
करणाऱ्या महिलेला अटक
एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
सातारा : राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजपचे नेते जयकुमार गोरे पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. गोरे यांच्यावर २०१७ साली एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेनं प्रसार माध्यमांसमोर येऊन जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या महिलेने प्रकरण मिटविण्यासाठी तीन कोटींची खंडणी मागितली होती. त्यापैकी तिला एक कोटीची खंडणीची रक्कम स्वीकारताना आज सकाळी सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना आपण यावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, यातून अजूनही अनेक बाबी समोर येतील, असे सांगितले आहे.
याबाबत माहिती अशी की, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर २०१७ साली एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जयकुमार गोरे यांना दहा दिवसाची शिक्षाही झाली होती. असे सांगितले जाते की जयकुमार गोरे यांनी या महिलेची माफी मागून माफीनामा लिहून दिला होता. पण अश्लील फोटो प्रकरणी एका यूट्यूब चैनलने पीडित महिलेला संपर्क साधून याविषयी माहिती घेऊन बातमी प्रसारित केली होती. त्यातच विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच या प्रकरणाने पुन्हा डोके वर काढल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण तापले असतानाच मंत्री जयकुमार गोरे यांना खासदर संजय राऊत यांनी तर छोटा किरीट सोमय्या असे संबोधले, तर विजय वडेट्टीवार यांनीही माध्यमातून प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे यांना एक पहिलवान रोज व्यायाम करणारा जो दहा दिवस तुरुंगावास झाला आहे, म्हटले होते. एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्यावरून विरोधकांनी जयकुमार गोरेंवर आरोप केल्याने विधानभवनात मोठा गदारोळ माजला होता.
ग्रामविकासमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये महिलांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता. यामध्ये महिलांनी गोरे यांना नाव गोरे कारनामे काळी असे म्हणत यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन गेले होते, तर साताऱ्यात भाजप महिला आघाडीच्या महिलांनी मंत्री जयकुमार गोरे यांची बाजू घेऊन सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. यामध्ये महिलांनी गेल्या आठ वर्षांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांना निर्दोष न्यायालयाने मुक्त केले आहे. जी महिला मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत आहे. तिच्यामुळे अनेक महिलांचे चारित्र्य बदनाम होत आहे, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी एक महिलेची छेडछाड केली आहे, असे सांगत काहीजण सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करत आहेत, तर काहीजण चुकीची वक्तव्य करून त्यांची बदनामी करत आहेत. त्याचबरोबर जयकुमार गोरे यांची बदनामी करण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा देखील चुकीचा वापर केला जात होता. यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची नाहक बदनामी होत आहे, हे निदर्शनास आल्याने सरसेनापतींच्या तळबीड गावातील ग्रामस्थ आक्रमक होत बदनामी थांबवण्यासाठी संबंधितांना इशारा दिला होता.
संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत माध्यमांना मुलाखती देत विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषण करणार असल्याचे सांगितलं होतं. मात्र, शुक्रवारी सकाळी सातारा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना राहत्या घरातून अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. सदर महिलेने या प्रकरणी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपये स्वीकारत असतानाच सातारा पोलिसांनी ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईसंदर्भात पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!