घोरपडीच्या गुप्तांगाच्या
तस्करीप्रकरणी
सोलापूरच्या तिघांना अटक
सोलापूर : वन्यप्राणी असलेल्या घोरपडीच्या गुप्तांगाची तस्करी केल्याप्रकरणी सोलापूर येथील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सोलापूर येथील वन विभागाने ही कारवाई केली. विठ्ठल सुग्रीव पाटोळे (वय 29), सुग्रीव रंगनाथ पाटोळे (वय 60, रा. दोघे रा. पिंपळा, ता. वडवणी जि. बीड), बाळासाहेब लक्ष्मण डोरले (वय 34, रा. चिखल जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, सोलापूर रेल्वे स्टेशनवर संशयित आरोपी घोरपडीचे गुप्तांग विक्री करण्यास येणार असल्याची आज सकाळी खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सकाळपासून सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली होती. संशयित आरोपी एका चारचाकी गाडीमधून घोरपडीचे गुप्तांग विक्रीसाठी घेऊन आले होते. रेल्वे स्टेशनवर आल्यावर ठरल्याप्रमाणे खबऱ्याने त्यांना ओळखले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संशयितांना पकडून ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 151 घोरपडीचे गुप्तांग सापडून आली आहेत. हा गुन्हेगार सराईत असून त्यांच्याकडून अशी कृत्य झाली असल्याचे समजते.
वन्यप्राणी घोरपड हा वनविभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेड्युल एकमध्ये येत असून अतिउच्च दर्जाचे त्याला संरक्षण देण्यात आलेले आहे. त्याची शिकार करणे व विक्री करणे याला दहा हजार रुपये दंड व सात वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 2/2, 9, 39,40, 48 अ,49अ व ब,50, 51, 57 अंतर्गत वन गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईसाठी मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे, हेमंत केंजळे कराड यांनी मोलाची मदत केली. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सोलापूर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, वनक्षेत्रपाल रोहितकुमार गांगर्डे, वनपाल रुकेश कांबळे, इरफान काझी, शशिकांत सावंत, वनरक्षक श्रीशिल पाटील, अश्विनी सोनके, योगेश जगताप, सायली ठोंबरे, रमेश कुंभार, सुरेश कुरले, रेणुका सोनटक्के, अनिता शिंदे, नितीन चराटे, वाहनचालक कृष्णा निरवणे हे उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!