पौष्टिक तृणधान्य महोत्सवात
ग्राहकांनी केली २२ लाखांच्या
मालाची खरेदी
सातारा : पौष्टिक तृणधान्य महोत्सव कालावधीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची सुमारे २२ लाख रुपयांची ग्राहकांनी खरेदी केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवण्याबरोबर विक्री कौशल्य विकसीत करून थेट माल विक्रीद्वारे जास्तीत जास्त नफा मिळविणे तसेच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण माल मिळणे व पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्व माहीत होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवामध्ये एकूण ६१ स्टॉलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण शेतमाल जसे माण, खंडाळाची देशी बाजरी, सातारा, खटावची देशी ज्वारी, कराडची नाचणी, जावळी, पाटणचा इंद्रायणी तांदुळ, खटावचा हिरवा मूग, कोरेगावचा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, वाई तालुक्यातील हळद तसेच फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळे तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ इ. वैशिष्ट्य पूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता आले. या माध्यमातून ३ दिवसांमध्ये २२ लाखापर्यंत विविध शेतमालाची विक्री झाली.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!