वणवा लावत असताना संशयित वनविभागाच्या ताब्यात



वनक्षेत्रात वणवा लावत असताना

संशयित वनविभागाच्या ताब्यात

सातारा : पाटण वन परिक्षेत्रातील झाकडे येथे राखीव वनक्षेत्रामध्ये निळ्या रंगाच्या टी शर्टमधील संशयित आरोपी नितीन साळुंखे हा वणवा लावत असताना रंगेहात पकडला. त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार कारवाई करण्यात आली.

या संशयित आरोपीने जंगलात दोन ठिकाणी वणवा लावला होता. तिसऱ्या वेळी वणवा लावत असताना रोहित लोहार वनरक्षक मोरगिरी यांनी रात्रदिवस गस्त घालत त्याच्यावर पाळत ठेवून त्याची मोबाईलवर चित्रफित बनवली. दोन ठिकाणी लावलेले वनवे ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच विझवल्याने मोठे वन क्षेत्र जळण्यापासून वाचले.

ही कारवाई उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्प) महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल पाटण ( प्रा.) राजेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Post a Comment

0 Comments