साखरपट्ट्यातील सह्याद्री साखर
कारखान्याची निवडणूक जाहीर
विद्यमान आमदार विरुद्ध माजी सहकारमंत्री यांच्यात होणार तुल्यबळ लढत
कराड : सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी ५ एप्रिल २०२५ला मतदान व ६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
सह्याद्री साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी निवडणूक रणशिंग फुंकल्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार आहे.
कारखाना निवडणुकीसाठी गुरुवार, दि. २७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. दि. ५ मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच दि. ६ मार्चला छाननी होणार असून ७ मार्च ते २१ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. दि. ५ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!