'किसन वीर'च्या शेतकऱ्यांना सहकार मंदिरात बसण्याची संधी मिळाली, ती फक्त मकरंद आबांमुळेच : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

'किसन वीर'च्या शेतकऱ्यांना

सहकार मंदिरात बसण्याची संधी

मिळाली, ती फक्त मकरंद

आबांमुळेच : प्रा. ढोबळे

भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्यावर लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांची जयंती साजरी

वाई : स्व. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांनी त्यांच्या काळात किसन वीर कारखान्यावर शेतकऱ्यांसाठी केलेले काम आजही त्यांचे कार्यकर्ते विसलेले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या जयंतीदिनी हा जनसमुदाय लोटलेला दिसून येत आहे. कर्जाच्या खाईत लोटलेला साखर कारखाना ताब्यात घेऊन शेतकऱ्यांची मागील सर्व उसाची बिले देऊन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री नामदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील यांनी दाखवून दिले की, तात्यांनी सांगितलेल्या वाटेवरच आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. त्यामुळेच आज किसन वीर कारखान्याच्या शेतकऱ्यांना सहकार मंदिरात बसण्याची संधी मिळत असल्याचे गौरोवोद्वार राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी काढले.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर स्व. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांच्या ८७ व्या जयंतीदिनी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही जी. पवार, किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, दत्तानाना ढमाळ, प्रतापराव पवार, बाळासाहेब सोळस्कर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, उदय कबुले, नितीन भुरगडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, शेतकऱ्यांचा जागर, त्यांच्या हितासाठी कर्तृत्वस्थानी असलेला साखर कारखाना, शेतकऱ्यांच्या हितासाठी व या पुढील काळात कर्जमुक्तीकडे वाटचाल करीत असलेले काम आज नामदार मकरंद आबा व खासदार नितीन काका पाटील यांच्याकडून होत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने किसन वीर कारखान्याची धुरा आपल्या ताब्यात दिलेली असल्याने हा कारखाना कर्जमुक्त झाला पाहिजे, या उदात्तहेतूने काम करताना अंगावर सोन्याचे ओझे वाहण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या संस्थेवरचे कर्जाचे ओझे कमी करण्यात पाटील कुटंबीयांची धन्यता मानतात, हे आपल्यासाठी चांगुलपणाचं असल्याचे प्रा. ढोबळे यांनी सांगितले. तात्यांनी सरपंचपदापासून ते खासदारकीपर्यंतच्या प्रवासात सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन काम केल्यामुळेच आज हे कुटुंब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपलेसे वाटते. यापुढील काळातही नामदार मकरंदआबा व खासदार नितीनकाका पाटील यांच्याकडूनही कार्यकर्त्यांना बळ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, आजही तात्या आपल्यामध्ये नाहीत, हे मनाला पटत नाही, क्षणोक्षणी आपल्याला आठवण येत असते. स्व. तात्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना जी दिशा दाखविलेली आहे. त्याच मार्गावर आम्ही मार्गक्रमण करीत काम करीत आहोत. कार्यकर्ते घडविण्यात तात्यांना खूप मोठा सिंहाचा वाटा होता, यामुळेच तात्यांच्याविषयी बोलताना शब्द अपुरे पडतात. तात्यांना सामजिक कार्याची आवड होती. यामुळेच त्यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले होते. यामध्ये ब्लड, बी. पी., शुगर, ई.सी.जी. कॅन्सर, नेत्र, मोतीबिंदू, टी. बी. यासारख्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. तसेच सातारा येथील संकल्प ब्लड सेंटर तर्फे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशिालिटी हॉस्पिटल, शेंद्रे येथील ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल, वाई येथील ग्रामीण रूग्णालय तसेच भुईज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे सांगून याचा लाभ जवळपास १४२० जणांनी घेतल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे,रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप च्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितंद्र रणवरे, शिवाजीराव महाडीक, साहेबराव जाधव, माजी संचालक दासबाबु गायकवाड, वाई मार्केट कमिटीचे चेअरमन मोहनराव जाधव, संचालक रमेश गायकवाड, पोपट जगताप, संजय मोहोळकर, महादेव मस्कर, शशिकांत पवार, मदन भोसले, दीपक बाबर, एस. वाय. पवार, चंद्रकांत ढमाळ, बबनराव साबळे, अजय कदम, यशवंत जमदाडे, ॲड. उदयसिंह पिसाळ, संपतराव शिंदे, मनिष भंडारी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी शेतकरी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

उभ्या पिकातून उसासाठी रस्ता देतो पण ऊस हा फक्त "किसन वीर'लाच दिला पाहिजे

ओझर्डे (ता. वाई) येथील पंडितराव कदम यांनी आपल्या उभ्या पिकातून ऊस वाहतुकीसाठी वाट करून दिली. त्यांची एकच अट होती की, हा २५ एकरमधील सर्व ऊस फक्त किसन वीर साखर कारखान्यालाच गळितासाठी गेला पाहिजे. यावरून शेतकऱ्यांचे किसन वीर कारखान्यावर किती प्रेम आहे हे दिसून येते. यावेळी पंडितराव कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments