आपल्या संघटनेचा पत्रकार
कुटुंबवत्सल, उद्योगी असला
पाहिजे, पण खंडणीखोर नसावा
: संस्थापक अध्यक्ष राजा माने
राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्रचे डिजिटल मीडिया धोरण जाहीर व्हावे
मुंबई येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राजा माने यांची माहिती
मुंबई : राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मीडिया धोरण लागू करावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपल्या संघटनेचा पत्रकार कुटुंबवत्सल असला पाहिजे, उद्योगी (व्यवसायिक) असला पाहिजे, पण खंडणीखोर अजिबात असता कामा नये. कारण, संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडियातील पत्रकारांना आता कुठे प्रतिष्ठा मिळत आहे, समाज मान्यता मिळत आहे, शासन मान्यताही लवकरच मिळेल. त्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी जोमाने तालुका ते मंत्रालय स्तरावर धडक देत आहेत. संघटनेचा अध्यक्ष मी असलो तरी संघटनेचं काम हे आपण, आम्ही म्हणूनच पुढे जात आहे. संघटनेचा प्रत्येक घटक इथे महत्त्वाचा आहे. त्याच माध्यमातून डिजिटल मीडिया धोरण राबवण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली.
मुंबईच्या मालाड येथील राजोरा बँक्वेट हॉल येथे राजा माने साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई शहर व उपनगरातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना राजा माने यांनी संघटनेचा इतिहास, राज्यभर वाढलेली व्याप्ती, पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानची माहिती दिली. तसेच, संघटनेच्या ६ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या अधिवेशनासह संघटनेची पुढील दिशा सांगितली.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय भैरे यांच्या नेतृत्वात मुंबईत कार्यरत असलेल्या डिजिटल मीडिया पत्रकार व संपादकांच्या वतीने राजा माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर व स्थानिक पत्रकार उपस्थित होते. या वेळी बोलताना राजा माने यांनी डिजिटल मीडिया धोरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानबद्दल माहिती दिली.
राजा माने यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय भैरे यांनी राजा माने यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत सकाळ आणि स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी मुंबईतील कामगार संघटनेचे नेते अभिजीत राणे, डिजिटल मीडिया संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य मयूर गलांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघुले, सचिव यतीन पवार, मुंबई विभागातील पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष भैरे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करताना राजा मानेंच्या पत्रकारितेतील प्रवासाचे आणि संघटनेच्या वाटचालीचे विशेष कौतुक केले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!