सातारा पोलिसांचा श्वान “सूर्या"
सुवर्ण पदकाचा मानकरी
रांची येथील ६८व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी
सातारा : झारखंड राज्यातील रांची येथे झालेल्या ६८व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलीस बीडीडीएस पथकातील श्वान “सुर्या” याने एक्सप्लोझीव इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस व सातारा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रांची येथील पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये देशातील २८ राज्य, स्पेशल फोर्सेस व केंद्रशासीत प्रदेश असे मिळून एकूण ४४ संघांनी सहभाग नोंदवला होता. एक्सप्लोझीव इव्हेंट विभागात लगेज सर्च, ग्राउंड सर्च, कार सर्च, फूड, रेप्यूजन आणि आज्ञाधारकपणा अशा प्रकारामध्ये ही स्पर्धा पार पाडली.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात श्वान “सुर्या” याने प्रथमच एक्सप्लोझीव विभागात सुवर्णपदक प्राप्त करून महाराष्ट्र पोलीस तसेच सातारा जिल्हा पोलीस दलाचे नाव भारत देशात उंचावले आहे.
सातारा पोलीस दलाचा श्वान “सुर्या ” हा अतिशय हुशार व कर्तव्य तत्पर आज्ञाधारक श्वान आहे. श्वान “सुर्या” याचे हॅन्डलर म्हणून पोलीस हवालदार निलेश दयाळ यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक गृह श्री. अतुल सबनीस आणि प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेखर कडव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चोखपणे पार पाडलेली आहे.
या दैदिप्यमान कामगिरीबद्दल श्वान “सुर्या ” व डॉग हॅन्डलर निलेश दयाळ, सेकंड हॅन्डलर सागर गोगावले यांचा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर व पोलीस उपअधीक्षक श्री. अतुल सबनीस यांनी विशेष सत्कार व कौतुक करून खास अभिनंदन केले आहे.
भविष्यात सातारा जिल्हा पोलीस दलातील इतर श्वान अशाच प्रकारची चांगली कामगिरी करून सातारा जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचवतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर व पोलीस उपअधीक्षक श्री. अतुल सबनीस, पोलीस उपनिरीक्षक शेखर कडव व बीडीडीएस पथकातील पोलीस जवान व इतर अधिकारी, अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!