छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये
राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा
उत्साहात संपन्न
सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराचे घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारामधील इतिहास विभागाच्या वतीने शिवजयंती महोत्सवानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्राच्या आर्थिक सहकार्यातून राज्यस्तरीय पोवाडा सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये छ. शिवाजी कॉलेज सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा, वाय. सी. कॉलेज सातारा सह प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर, के. बी. पाटील कॉलेज, सातारा, गुरुकुल स्कूल सातारा, कन्या विद्यालय उंब्रज, जि. प. प्राथ. शाळा अंबावडे (सं.वा.)ता. कोरेगाव, जि. प. प्राथ. शाळा भुयाचीवाडी ता. कराड, फोक्सन एज्युकेटर्स सातारा आदी शाळा व महाविद्यालयामधून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पोवाड्याच्या माध्यमातून स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वीर बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगडचा रणसंग्राम, शिवचरित्र इत्यादी विषयांवर पोवाड्यांचे बहारदार सादरीकरण करून शिवकाळ पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला.
या स्पर्धेमध्ये जि.प.प्राथ.शाळा अंबावडे (सं.वा.) ता. कोरेगाव येथील शाहीर कु. ईश्वरी शिंदे व तिच्या संघाने प्रथम क्रमांक, छत्रपती शिवाजी कॉलेजमधील शाहीर श्री. प्रताप सुमंत खरात आणि त्याच्या संघाने द्वितीय तर प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर येथील विद्यार्थी शाहीर श्री. अनिकेत दत्तात्रय खताळ याने तृतीय क्रमांक मिळविला.
पोवाडा स्पर्धेच्या समारोप समारंभप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रम आयोजनापाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य श्री. जे. के. बापू जाधव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सहभागी स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी भूषविले. स्पर्धेच्या आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के व प्र.कुलसचिव डॉ. विजय कुंभार यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. कल्याण राक्षे व श्री. राजीव मुळ्ये यांनी कामकाज पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. महादेव चिंदे यांनी केले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक श्री. एस. वाय जाधव, मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. (डॉ.) अनिलकुमार वावरे, भाषामंडळाचे प्र. संचालक प्रो. (डॉ.) सुभाष वाघमारे, सांस्कृतिक विभागाच्या संचालिका प्रो.(डॉ.) मनीषा पाटील, कार्यालयीन प्रमुख श्री. तानाजी सपकाळ, इतिहास विभागातील व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षक व शिक्षकेतर प्रशासकीय सेवक व विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्यातून सदरचा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!