विद्यार्थ्यांनो, स्वराज्याचे
स्वप्न पूर्ण करणाऱ्या
शिवाजी महाराजांसारखे
व्हा : पद्मश्री लक्ष्मण माने
जवाहर नवोदय विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मुलाखतीचे आयोजन
सातारा : विद्यार्थ्यांनी अधिकाधिक श्रम करून डॉ. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्यासारखे ज्ञानी, विद्वान व शिक्षणप्रेमी व्हावे. सातारा जिल्ह्यात अनेक वीरांनी, विद्वानांनी, पराक्रमी व शूर महिलांनी इतिहास घडवला. आपणही स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे झाले पाहिजे. ध्येय घेऊन मुलांनी जगले पाहिजे, केवळ ते ठरवून त्यातच रंगून जाऊ नये, तर ते जगावे, साकार करावे, असे आवाहन उपराकार, पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले.
सातारा येथे पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने पद्मश्री लक्ष्मण माने यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
उपराकार लक्ष्मण माने म्हणाले, विद्यार्थ्यांनी सद्यपरिस्थिती समजून घ्यावी. आपण आणि आपला देश समृद्ध करण्याचे वेड विद्यार्थ्यांना याच काळात लागले पाहिजे. भारताला सुजलाम सुफलाम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे. मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. माहिती घेण्यापेक्षा ज्ञानी बनण्याचा ध्यास लागला पाहिजे, त्यासाठी चांगल्या ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. शेतकरीच क्रांती घडवून आणतो त्याच्या दररोजच्या जगण्यातूनच त्याने साहित्यिक क्रांती केलेली आहे. विविध शब्दांची निर्मिती हे श्रमिकांच्या श्रमातून, शेतात घाम गाळून शेती फुलविणाऱ्या शेत मजुरांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक श्रम करून डॉ. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्यासारखे ज्ञानी, विद्वान व शिक्षणप्रेमी व्हावे. सातारा जिल्ह्यात अनेक वीरांनी, विद्वानांनी, पराक्रमी व शूर महिलांनी इतिहास घडवला. आपणही स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे झाले पाहिजे. ध्येय घेऊन मुलांनी जगले पाहिजे, केवळ ते ठरवून त्यातच रंगून जाऊ नये तर ते जगावे, साकार करावे.
या वेळी सामाजिक समस्या, शैक्षणिक व्यवस्था, साहित्यिक परिस्थिती व सध्याचे राजकारण यावर ही आपल्या मुलाखतीतून विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. पद्मश्री लक्ष्मण माने यांची मुलाखत एकनाथ उत्तम तेलतुंबडे, श्री.मनीष आंबेकर व श्री.सचिन काळनर या शिक्षकांनी घेतली.
सामाजिक विज्ञान विभागाकडून तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधान वृक्षाचे व ग्रंथालयाचे निरीक्षण पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले. कला शिक्षक श्री. प्रशांत हरदास यांनी सहकार्य केले. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या अँसी ए. जे. यांनी पद्मश्रींचा सत्कार केला. या वेळी शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!